मुंबई – महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुधवारी जोरदार हल्लाबोल केला. समीर वानखेडे, मुन्ना यादव, हैदर आझम आणि बनावट नोटा प्रकरणावरून नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ सुरू असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला.
मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर काही आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस मी जी लढाई लढतोय ती एनसीबीकडून निर्दोष लोकांना फसवले जाण्याचा विषय आहे. हजारो कोटींच्या खंडणी वसुलीच्या प्रकरणावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. फडणवीसांचे आणि त्या अधिकाऱ्याचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी २००८ मध्ये सेवेत येतो, १४ वर्षांपासून मुंबई सोडत नाही या मागचे गणित काय? असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
देवेंद्र फडणवीस इतरांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करीत आहेत; मात्र तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या लोकांना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का बनवले?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मुन्ना यादव नावाचा व्यक्ती नागपूरचा गुंड आहे. तो आपला राजकीय दबाव करणारा साथीदार आहे. त्याला आपण कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवले होते की नाही. मुन्ना यादव तुमच्या गंगेत पवित्र झाला होता की नव्हता?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
हैदर आझम नावाच्या आपल्या नेत्याला मौलाना आझाद वित्तीय महामंडळाचा अध्यक्ष केले होते की नव्हते?, हैदर आझम बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न करतो की नाही?, हैदर आझमची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. बंगाल पोलिसांनी जन्मदाखले आणि इतर कागदपत्रे खोटी असल्याची माहिती दिली होती. मालाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता.
मोदींनी नोटबंदी जाहीर केली. पंजाब, मध्य प्रदेशात खोट्या नोटा पकडल्या जात होत्या; मात्र ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नाही. तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळे बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरू होता. ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बीकेसीमध्ये छापेमारी केली. १४ कोटी ५६ लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. बनावट नोटांप्रकरणी पुण्यात आलम शेखला अटक झाली. रियाझ शेखला नवी मुंबईत अटक झाली होती. १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटांचे हे प्रकरण ८ लाख ८० हजार रुपयांचे असल्याचे सांगून दाबण्यात आले.
आमचा तुम्हाला सवाल आहे की, रियाझ भाटी कोण आहे. २९ ऑक्टोबरला रियाझ भाटी बनावट पासपोर्टसोबत सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम संबंधाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. रियाझ भाटी सर्व कार्यक्रमात तुमच्या सोबत का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचा नाही. त्यांच्या कार्यक्रमात जायचे असल्यास तपासणी केल्याशिवाय परवानगी मिळत नाही. रियाझ भाटीने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढले. रियाझ भाटीसोबत तुम्ही वसुलीचे काम केले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …