ठळक बातम्या

मुंबई महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! २० हजार सानुग्रह अनुदान मिळणार

मुंबई – महापालिकेच्या सुमारे ९५ हजार व बेस्ट उपक्रमाच्यासुमारे ३२ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. २० हजार रूपये सानुग्रह अनुदान पुढील ३ वर्ष मिळणार आहे. त्यामुळे कामगार नेते व कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी व मुंबईकरांना आपल्या नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत होते. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत पालिका आणि बेस्ट व पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंर्त्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला . त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांचे आभार मानले आहे असे म्युनिसिपल कामगार कमर्चारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्ष म्हणजेच २०२३ – २४ पर्यंत दरवर्षी २० हजार रुपये बोनस दिला जाणार आहे.मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या काळात केलेल्या कामाची दखल घेऊन मागील वर्षापेक्षा बोनसची रक्कम वाढवून द्यावी अशी मागणी पालिकेतील कामगार संघटनांमार्फत केली जात होती.१ नोव्हेंबरपर्यंत बोनस जाहीर केला नाहीतर आंदोलनाचा इशारा दि. म्युनिसिपल युनियनने दिला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …