मुंबई – महाराष्ट्राच्या समृद्धीची द्वारे खुली करणारा मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या दोन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात नुकतीच दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, येत्या दोन महिन्यांत यातील शिर्डी ते नागपूर हा महामार्ग सुरू होईल. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबईदरम्यानच्या १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर ते नागपूरमधील मिहान विमानतळ यांना जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करून आवश्यक माल संपूर्ण भारतात वेळेवर पोहोचवणे या मार्गाद्वारे शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बुस्टर डोस समजला जाणारा हा बहुचर्चित मार्ग कधी सुरू होतोय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तो पुढील दोन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला होईल, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाविषयी बोलताना म्हणाले की, राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणत आहे. सध्याच्या काळात पर्यावरण जपणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्ही या महामार्गाच्या बाजूला ग्रीन झोन उभा करीत आहोत. तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकदेखील सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …