मुंबईने पार केला कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा पार

मुंबई – संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. या सर्व वातावरणात मुंबईबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने कोरोनाप्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.
मुंबईने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे. मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे १ कोटी ८१ लाखांपेक्षा अधिक लसी देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. पहिली आणि दुसरी मात्रा यांचा एकत्रित विचार करता, ५ मे २०२१ रोजी २५ लाख, २६ जून २०२१ रोजी ५० लाख, ७ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ लाख, ४ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला. त्यानंतर, २८ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी २५ लाख, १० नोव्हेंबर २०२१ रोजी १ कोटी ५० लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी दुपारअखेर १ कोटी ८१ लाखांहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …