ठळक बातम्या

मुंबईत ३३० रुग्णांची भर तर ५ जणांचा मृत्यू

मुंबई – गेल्या काही दिवसांचा विचार करता मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ५ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ३७८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा कोरोना मुक्ती दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ३३८६ इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत ७,३४,५९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १६४२ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर ०.०४ टक्के इतका झाला आहे.
मुंबईतील १० हजार सोसायट्या लसवंत झाल्या असून १० हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या इमारतींवर महापालिकेकडून विशेष लोगो लावला जातोय. मुंबईतील १०० टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर ‘फुल्ली व्हॅक्सिनेटेड’ असा लोगो लावण्यात येणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबई लसवंत होणार असल्याचा सत्ताधारी शिवसेनेचा दावा आहे. मुंबईत एकूण ३७ हजार इमारती आहेत. त्यापैकी १० हजार इमारती संपूर्ण लसवंत झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …