ठळक बातम्या

मुंबईत १० मिनी फायर स्टेशन उभारणार -अश्विनी भिडे


मुंबई – आगीच्या दुर्घटनेत होणारी जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी पालिका अग्निशमन दलाचे अत्याधुनिकरण होत असून, मिनी फायर स्टेशनची संख्या वाढवण्यात येत आहे. सद्यस्थितीत पालिकेची ३५ मोठी फायर स्टेशन आहेत, तर गेल्या ५ वर्षांपासून राबवण्यात येणाऱ्या ‘प्रोग्राम ऑन इनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रमात १८ मिनी फायर स्टेशन उभारण्यात आली आहेत. आणखी १० मिनी फायर स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
पालिकेचे अग्निशमन दल देशात सर्वोत्तम आहे, असे सांगत आगामी योजनांची माहिती भिडे यांनी दिली. मुंबईत घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांसह सर्व प्रकारच्या दुर्घटनांमध्ये अग्निशमन दल तातडीने धावून जात बचावकार्य करते. मुंबईत वाढलेली बांधकामे आणि दाटीवाटीच्या वस्ती असल्याने बचावकार्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात आग लागल्यानंतर पीक अवरमध्ये ‘रिस्पॉन्स टाईम’ २० मिनिटे तर उपनगरात ३० मिनिटे आहे. केंद्रीय नियमावलीनुसार, हा कालावधी साडेसहा ते साडेसात मिनिटे असायला हवा. मात्र, मुंबईच्या स्थितीत हे आव्हान ठरत आहे. त्यामुळे ‘प्रोग्राम ऑन इनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रमात मिनी फायर स्टेशनची संख्या वाढवण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

2 comments