मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रो रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

मुंबई – मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या १० दिवसांत म्हणजेच २१ ते ३१ डिसेंबर या १० दिवसांत मलेरियाचे २८८, गॅस्ट्रोचे ४३३, तर डेंग्यूच्या ४० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईत साथीच्या आजारांचे संकट कायम आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली असून, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूने मुंबईत पाय रोवले आहेत. त्यामुळे कोरोना व ओमिक्रॉन विषाणूविरोधात लढा सुरू असून, वाढते साथीचे आजार पालिकेच्या आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. दरम्यान, एचवनएनवन रुग्ण आटोक्यात असून, गेल्या १० दिवसांत एकही स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण आढळला नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …