मुंबई – पवईत कार सर्व्हिस सेंटरला गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत सेंटरमधील काही गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. सकाळी ११च्या दरम्यान लागलेली आग काही क्षणात भडकत गेल्याने या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तब्बल तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पवईतील साकीनाका विहार रोडवरील सी लँड हॉटेलजवळ असलेल्या ह्युंडाई साई ऑटोच्या शोरूमला गुरुवारी सकाळी ११ च्या सुमाराला आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोरूममध्ये देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्यांपैकी काही गाड्या जळून खाक झाल्या. आग काही क्षणात भडकत गेल्याने आजूबाजूच्या परिसरांत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. आग वाढत गेल्याने शोरूमच्या बाजूच्या इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंब, चार पाण्याचे टँकर्स आणि इतर उपकरणांसह तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस, अग्निशमन दलाकडून केला जात आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …