ठळक बातम्या

मुंबईत आता २३६ नगरसेवक

मुंबई – मुंबई महानगरपालिकेत वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या नागरिकरणामुळे नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा देता याव्यात, यासाठी मुंबई महानगरपालिकेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून आता २३६ होणार आहे. पर्यायाने शहर व उपनगरांतील प्रभागांची संख्याही २२७ वरून आता २३६ होणार आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. वॉर्ड फेररचना अध्यादेश काढल्यानंतर होईल. मुंबई महानगरपालिकेत आता ९ प्रभाग वाढल्यानंतर नगरसेवकांची संख्याही ९ने वाढणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …