मुंबईतील वरळीत गॅस सिलिंडर स्फोट; चार महिन्यांच्या बाळासह चौघे होरपळले

मुंबई – मुंबईतील वरळी येथे मंगळवारी आगीची एक भयानक घटना घडली. वरळीतील बीडीडी चाळीत एका घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका चार महिन्यांच्या बाळासह चौघे जण होरपळले. जखमींना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
वरळीतील कामगार वसाहत येथील बीडीडी चाळ क्रमांक ३ मधील एका घरात सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. आगीची घटना कळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग लेव्हल १ ची असल्याची माहिती आहे. या स्फोटात चौघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका चार महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आनंद पुरी (२७), मंगेश पुरी (४ महिने), विद्या पुरी (२५), विष्णू पुरी (५) अशी जखमींची नावे आहेत. आनंद पुरी आणि चार महिन्यांचे बाळ यांची प्रकृ ती गंभीर असल्याची माहिती आहे, तर विद्या पुरी आणि विष्णू पुरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …