मुंबईतील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात

पाचव्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीचे निष्कर्ष जाहीर
मुंबई – कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग)अंतर्गत पाचव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. एकूण २२१ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिएंट’चे ११ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ८९ टक्के रुग्ण, तर ओमिक्रॉनचे २ रुग्ण सापडले आहेत. लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे. चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण हे संकलित नमुन्यांच्या संख्येत एक टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. संकलित केलेल्या २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. चाचणीचे निष्कर्ष पाहता कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षांच्या आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ६९ रुग्ण (३१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटातील ७३ रुग्ण (३३ टक्के), ६१ ते ८० वर्षे वयोगटातील ५४ रुग्ण (२५ टक्के) आणि ६१ ते १०० वर्षे वयोगटातील ६ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत. दोन ओमिक्रॉन बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची देखील कोविड चाचणी केली असता त्यातही कोणालाही कोविड बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …