मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय – डॉ. भारती पवार

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवीत, असा सल्ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी येथे दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमिक्रॉनबाबत डॉ. भारती पवार यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. भारती पवार म्हणाल्या, राज्य सरकारने लसीची मागणी केली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, तर काय काळजी घ्यायला हवी, तसेच त्या-त्या राज्यांनी काय निर्णय घ्यायला हवेत त्या सूचना दिल्या आहेत. आम्ही राज्याच्या मागण्या पूर्ण करीत आहोत. आता राज्याने काम करण्याची गरज आहे, तसेच सध्या राज्य सरकारचे काम संथगतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करीत आहे, परंतु राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.
प्रत्येक राज्यावर केंद्राचे लक्ष आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून त्यांनी यासंदर्भात निर्णय घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आताच काळजी घेतली, तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यांतील आरोग्य सचिवांसोबत चर्चा करीत आहेत, असे देखील डॉ. भारती पवार यावेळी म्हणाल्या. केंद्राने सर्वच बाबतीत राज्याला मदत दिलेली आहे. केंद्र राज्याच्या मागण्या पूर्ण करीत नाही, हे जर मला मंत्र्यांनी लेखी दिले, तर बरे होईल. आता केंद्राने ज्या सूचना केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी राज्यांनी करावी. आयसीयू, बेड्स उपलब्धता याबाबत केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत. तसेच किट्ससाठीही राज्यांना निधी दिला आहे, असे डॉ. भारती पवार म्हणाल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …