मुंबईतील अविघ्न टॉवर इमारतीत अग्नितांडव

जीव वाचवताना खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील करी रोड आणि लोअर परेल रेल्व स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर अविघ्न पार्क या रहिवासी इमारतीला शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या साठमजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली होती. सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग चार नंबरची घोषित करण्यात आली. यादरम्यान एक दुर्दैवी घटला घडली. आगीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी उंचावरुन खाली पडल्याने तो मृत्युमुखी पडला. अरुण तिवारी असे या दुर्दैवी घटनेत मरणपावलेल्या रहिवास्याचे नाव आहे. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे.
करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. १९ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर विसाव्या मजल्यापर्यंत पसरली. आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. आग १९ व्या मजल्यावर लागल्याने धूर वरती पसरत खाली येत होता. शिवाय संपूर्ण इमारतीतील मजले रहिवाशांनी भरलेले नव्हते. त्यामुळे इमारतीच्या इतर विंगमधील रहिवाशांनी बाहेर पडण्यासाठी धावपळ केली. रहिवास्यांनी धावपळ करत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन उर्वरित सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन आग संपूर्ण इमारतीत पसरू दिली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाला इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढता आले. याच दरम्यान १९ व्या मजल्यावर एकजण आडकला होता. तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना तो इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी काळ्या कुट्ट धुरातून मार्ग काढत तिवारी इमारतीच्या सज्जावर जाऊन लटकून राहिला, मात्र हात सुटून तो थेट खाली कोसळला. दुर्दैवाने जमिनीवर पडून त्यांचा मृत्यू झाला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published.