ठळक बातम्या

मुंबईच्या तरुणीला भेटण्यासाठी ओलांडली भारताची सीमा; पाकिस्तानी तरुणाला अटक

जयपूर – एका पाकिस्तानी तरुणाने भारतीय (मुंबईतील) तरुणीला भेटण्यासाठी सीमा ओलांडली. भारतीय तरुणीला भेटण्यासाठी हा पाकिस्तानी तरुण चक्क तारेच्या कुंपणाखालून भारतात आला. श्री गंगानगर (राजस्थान)चे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, शनिवारी रात्री राजस्थानमधील गंगानगर सीमाभागात सैनिकांनी एका पाकिस्तानी तरुणाला तारेचे कुंपण ओलांडून सीमा पार करताना पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर तो पाकिस्तानहून तरुणीला भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. तरुणीला भेटसाठी हा २२ वर्षीय पाकिस्तानी तरुण सीमेवरून पाकिस्तानहून भारतात आला.
तरुणीसाठी सीमेपलीकडे येणाऱ्या तरुणाचे नाव मोहम्मद आमिर असे आहे. तो पाकिस्तानच्या सीमावर्ती जिल्ह्यातील बहावलपूरच्या हसीलपूर तहसीलमधील रहिवासी आहे. मोहम्मद आमिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणाने प्राथमिक चौकशीदरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितले की, तो फेसबूकवर भेटलेल्या मुंबईतील महिलेच्या संपर्कात होता. कालांतराने ते चांगले मित्र बनले, मोबाइल नंबरची देवाण-घेवाण केली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णयदेखील घेतला.
पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, या तरुणाकडे फक्त एक मोबाइल फोन आणि काही चलनी नोटा होत्या. या प्रकरणाची तपशीलवार चौकशी सुरू आहे. सुरक्षा विभागाने अद्याप याबाबत काही पुष्टी केलेली नाही. गुप्तचर अधिकाऱ्यांचे एक संयुक्त पथक याप्रकरणी चौकशी करेल. त्याने केलेल्या प्रत्येक दाव्याची उलट तपासणी करण्यात येईल.
मोहम्मद आमिरने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने मुंबईला जाण्यासाठी भारतीय व्हिसासाठी अर्ज केला होता, पण भारतीय अधिकाऱ्यांनी विनंती नाकारली. व्हिसा नाकारल्यानंतर, त्याने तरुणीला भेटण्यासाठी सीमेवरील कुंपण ओलांडण्याचा निर्णय घेतला. अतिदुर्गम सीमावर्ती ठिकाणाहून १२०० किमी दूर मुंबईपर्यंत कसा पोहोचणार याबाबत मोहम्मदला आमिरला खात्री नव्हती. पोलिसांनी विचारले असता, आपण कसेतरी मुंबईत पोहोचलो असतो, असे आमिर म्हणाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी अद्याप मुंबईतील महिलेशी संपर्क साधलेला नाही. आमिरच्या संयुक्त चौकशीनंतर गरज पडल्यासच हे केले जाईल. आमिर सध्या मुंबईतील महिलेला भेटू शकेल अशी शक्यता नाही. तरुणाने सांगितलेली गोष्ट खरी असेल आणि त्यात काहीही संशयास्पद नसेल, तर त्याला परत पाकिस्तानकडे सोपवले जाईल, अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान आपण मुंबईमधील तरुणीच्या प्रेमात पडलो. तिला भेटण्यासाठी आपल्याला भारतामध्ये यायचे होते, मात्र वारंवार व्हिसासाठी अर्ज करूनदेखील आपल्याला व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे आपण सीमा ओलांडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या तरुणाने दिली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …