मुंबईकरांना दिवाळीभेट : लसवंतांना मिळणार ‘लोकल प्रवासा’चे तिकीट!

ठाकरे सरकारचे रेल्वे प्रशासनाला पत्र
मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिवाळीभेट दिली आहे. लसवंतांना (कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले) आता एक दिवसासाठी लोकल प्रवासाचे तिकीट मिळणार आहे. लसवंतांना एक दिवसासाठी लोकल प्रवासाचे तिकीट द्यावे, असे पत्र राज्यातील ठाकरे सरकारने रेल्वे प्रशासनानाला लिहिले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी तिकीट देण्यात यावे, असे पत्र राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिले आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीट विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते; मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला होता. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले आहे. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना किंवा इतरांनाही एका दिवसाच्या प्रवासाचे तिकीट देण्यात यावे, यासाठी पत्र लिहिले आहे. याशिवाय कोरोना लस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाचे तिकीट द्यावे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भातील खात्री करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे पत्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
राज्य सरकारने रेल्वेला दिलेल्या पत्रात कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना एका दिवसासाठीच्या प्रवासाचे तिकीट देण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक प्रकारची दिवाळीभेट ठरली आहे. पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे, अशी विनंती केली गेली आहे. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावेत, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी, अशा सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात नमूद आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …