ठळक बातम्या

मी तर वर्षभरापूर्वीच सांगितले होते की एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झालीय – सचिन सावंत

मुंबई – काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा एक व्हिडीओ शेअर करून एनसीबीवर जोरदार निशाणा साधला आहे. आपण हे वर्षभरापूर्वीच सांगितलं असल्याचे म्हटले आहे. सचिन सावंत यांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हाच व्हिडीओ त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत त्यांनी “मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की एनसीबी आता ‘नमो कंट्रोल ब्यूरो’ झाली आहे. आणि हे ‘झेड प्लस’ सुरक्षा दिल्यानंतर स्पष्टच झाले आहे,’ असे म्हणत हल्लाबोल केला आहे.
सावंत यांनी वर्षभरापूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ते एनसीबीवर आरोप करताना दिसत आहेत. ‘बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन, चंदन तस्करी आणि गोवा कनेक्शनमधील भाजपच्या सहभागाची चौकशी जाणूनबुजून केली जात नाही, त्याकडे दुर्लक्ष का केले जातंय?’ असे म्हटले होते. ‘एनसीबी 59 ग्रॅम गांजाच्या जप्तीमधून मोठा वाद उभा करते आहे. पण कर्नाटकमध्ये चंद्रकांत चौहान नावाच्या भाजपा कार्यकर्त्याकडे 1200 किलो गांजा सापडला. पण एनसीबीकडे तिथे जाण्यासाठी वेळ नाही. कर्नाटक सँडलवूड ड्रग्ज रॅकेटमधील मुख्य आरोपी रागिनी द्विवेदी भाजपाच्या स्टार प्रचारक होत्या. 12 लोकांवर आरोप ठेवण्यात आले. त्यापैकी आदित्य अलवा हा विवेक ओबेरॉयचा मेहुणा आहे. विवेक ओबेरॉय भाजपाचा गुजरातमधला स्टार प्रचारक आहे. मोदींच्या बायोपिकचा तो सहनिर्माता आहे. तो संदीप सिंगचा पार्टनर आहे. त्यांची एकमेव कंपनी आहे जिला गुजरात सरकारने बोलावलं आणि त्यांच्यासोबत 177 कोटींचा एमओयू केला. देवेंद्र फडणवीस सीएम असताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण कसं केलं?” असं सावंत यांनी म्हटले होते.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …