ठळक बातम्या

माथाडी कामगारांचा संप मागे; पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव आजपासून सुरू

लासलगाव – शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. पिंपळगाव बसवंत येथे सुरू असलेला संप अखेर मागे घेतल्याची घोषणा माथाडी कामगारांनी गुरुवारी केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत.
पिंपळगाव बसवंत कृ षी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या गोदामावर काम करणाऱ्या टोळी क्रमांक दोनच्या माथाडी कामगारांनी मंगळवारी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याची घोषणा केली. ऐन दिवाळीनंतर हे आंदोलन सुरू झाले. खरे तर दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या अगोदरच दहा दिवस बंद होत्या. त्यानंतर हे आंदोलन सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. या आंदोलनावर तोडगा निघत नव्हता. शेवटी नाशिक येथील कामगार आयुक्तांनी तातडीने याची दखल घेत कांदा व्यापारी आणि टोळी क्रमांक दोनच्या माथाडी कामगारांची बैठक घडवून आणली. या बैठकीत कामगारांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संपावर गेलेल्या जवळपास साडेतीनशे माथाडी कामगारांनी कामावर येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पिंपळगाव बसवंत कृ षी उत्पन्न बाजार समितीनेही शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू होतील, अशी माहिती दिली. या आंदोलनाचा तिढा सुटल्याने कांद्याच्या लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लासलगाव कृ षी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळी आणि लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी अंदाजे ८२५० क्विंटल कांद्याची आवक झाली, तर १०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. आगामी काळात कांद्याची आवक वाढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …