माझ्यावरील गुन्हे राजकीय – मुन्ना यादव यांचे स्पष्टीकरण

नागपूर – मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा १० वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळे माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे मुन्ना यादव यांनी दिले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. मुन्ना यादव यांच्यावर गुन्हे दाखल असताना, अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा असलेले पद कसे दिले? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना मुन्ना यादव म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांनी मला बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष केले. कारण मी बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आहेत. निवडणुकीच्या वादातून हे गुन्हे विरोधकांनी माझ्याविरोधात दाखल केले आहेत. आंदोलन करीत असताना, राजकीय गुन्हे दाखल होतात. माझ्याविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नाहीत. याप्रकरणी आधीच माझी चौकशी झाली आहे. त्यात काहीही सापडले नाही. सरकार त्यांचे आहे. आता पुन्हा चौकशी करावी. मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असेही यादव म्हणाले.
मलिक यांनी मला गुंड संबोधून माझी प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे मुन्ना यादव यांनी सांगितले. यासाठी वकिलांचा सल्ला घेणार आहे. फडणवीसांनी आरोप केल्यामुळं आता मलिकांनाही काही सूचत नाही. त्यामुळे अशाप्रकारचे खोटे आरोप केले जात आहेत, असेही यादव म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …