महिलांचा आवाज काढून अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोन ठगांना अटक

नवी मुंबई – ड्रीम गर्ल चित्रपटामधील नायक आयुष्मान खुराना जसा मुलींचा आवाज काढून पुरूषांना प्रेमजाळ्यात फसवत होता, तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. आरोपी पुरूष महिलेचा आवाज काढून ज्वेलर्स शॉप मालकांची आणि औषध दुकानदारांची फसवणूक करून त्यांच्याकडील पैसे लुटत होता. नवी मुंबई पोलिसांनी या दोन ठगांना अटक करीत त्यांचा खेळ जगासमोर आणला आहे. आरोपींवर फसवणुकीचे २० गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, गुजरात आधी भागांत त्यांनी महिलांच्या आवाजात फोन करून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत पैसे लुटल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. हा प्रकार नवी मुंबईत जास्त होऊ लागल्याने गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची निर्मिती करीत आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. विश्वसनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मुख्य आरोपी मनिष शशिकांत आंबेकर (४४) हा पनवेलमधील तर त्याचा साथीदार अँथोनी तय्यप्पा जंगली (३७) हा मुंबईतील माटुंगा येथे राहणारा आहे. पोलीसांना नवी मुंबईतील दोन तर पेण व अलिबागमधील प्रत्येकी एक अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले असून आरोपीकडून एकूण पाच लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मनिष आंबेकर याच्यावर मुंबईमध्ये ६, पुण्यामध्ये १, पालघरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये ३, ठाण्यामध्ये ६ नवी मुंबईमध्ये १ असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published.