मुंबई – भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंबंधीच्या वक्तव्यप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळीतील सिलिंडर स्फोटप्रकरणी टीका करताना शेलारांनी किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेलारांची पाठराखण केली आहे. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असे ते म्हणाले. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्याने बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेले वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भातील सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. त्यानुसार गरज भासल्यास आरोपीला अटक करण्यात यावी, असे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …