ठळक बातम्या

महात्मा गांधींबद्दल बरळणाऱ्या कालीचरण बाबासह एकबोटे बंधूंवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे – धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकबोटे बंधूसह कालीचरण बाबा विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी संघटक कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू आणि कालीचरण महाराज यांच्यासह सहा जणांविरोधात खडकमाळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सोमनाथ ढगे यांनी यासंबंधीची फिर्याद दिली असून, मिलिंद रमाकांत एकबोटे (कार्याध्यक्ष – समस्त हिंदू आघाडी संघटना शिवाजी नगर), मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपूरे (सामाजिक कार्यकर्ता), कालीचरण महाराज (रा. अकोला), कॅ प्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
घटनेचा व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे अधिक तपास करीत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …