ठळक बातम्या

महाडमध्ये महिला सरपंचाच्या हत्येने खळबळ

जंगलात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय
महाड – तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सरपंच असलेल्या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकल्याची खळबळजनक घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. संबंधित महिलेवर बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृ त माहिती दिलेली नाही. जंगलात रस्त्याच्या कडेला सोमवारी दुपारी या सरपंच महिलेचा मृतदेह सापडला होता.
मृत महिला सरपंचाच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला आहे. घटनास्थळी त्यांना फरफटत आणल्याच्याही खुणा सापडल्या आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांची हत्या करून मृतदेह जंगलात टाकल्याचा अंदाज आहे.
सरपंच असलेली ही महिला सकाळी चुलीसाठी लाकडे (सरपण) गोळा करायला घराबाहेर पडली होती, मात्र दुपारी दोनच्या सुमारास तुडील-भेलोशी रस्त्यालगत आदिस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगतच्या जंगलात एका व्यक्तीला त्यांचा मृतदेह आढळला. गावातील एक तरुण महाडकडे येत असताना, त्याने रस्त्यालगत फाट्यांची भारी (मोळी) पाहिली, मात्र कोणीही दिसले नाही म्हणून सदर तरुणाने परिसरात बघले असता, रस्त्यालगत जंगल भागात सदर महिला मृतावस्थेत दिसून आली. त्याने पोलीस पाटलांच्या माध्यमातून महाड पोलिसांना याविषयीची माहिती दिली. महाडचे उपविभागीय पोलीस अधीक्षक, तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून महिला सरपंचाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे हत्येपूर्वी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावेत, किंवा तसे प्रयत्न झाले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र याला अद्याप अधिकृ त दुजोरा मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल. ही हत्या नेमकी कोणी केली, हत्येचे कारण काय, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की अन्य कुठल्या कारणास्तव? याचा अद्याप शोध लागलेला नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …