आ. रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ
जळगाव – मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी (मविआ)च्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या तपास संस्थांच्या कचाट्यात सापडले आहेत. याच कारणामुळे ईडी, सीबीआय तसेच आयकर विभाग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात मविआ सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल? याबाबत रणनीती आखण्यात आली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला. ते शुक्रवारी जळगावात बोलत होते. रोहित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात शुक्रवारी दुपारी दीड वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. या बैठकीत मविआच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल? याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे, असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला. तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …