ठळक बातम्या

मराठी भाषेला लोकमान्यतेसाठी ‘ लोकचळवळ’ उभारणार – देसाई

राष्ट्रपतींनाही पाठविणार पत्र
कुसुमाग्रज नगरी/नाशिक – मराठी भाषा अभिजात असल्याचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. असे असतानादेखील केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पडून आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात राजमान्यता मिळेल तेव्हा मिळेल; पण तोपर्यंत लोकमान्यता मिळवून देण्यासाठी लोकचळवळ उभारली जाणार आहे. केंद्राने लवकर मान्यता द्यावी, यासाठी सामान्य नागरिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याची मोहीम सुरू केली असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले, तसेच राष्ट्रपतींकडे याचिका करण्यासाठी एक (०१) कोड केला असल्याची माहिती त्यांनी दिली. मराठी भाषा विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी दालन’ उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे, याची माहिती व अभिजात मराठीची ऐश्वर्य गाथा या दालनाच्या माध्यमातून जगासमोर पोहोचणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, मराठी भाषा सहसचिव मिलिंद गवांदे, अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, संमेलनाच्या सर्व समित्यांचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले उपस्थित होते.
मराठी प्राचीन भाषा असून, ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. या संदर्भातील अनेक पुराव्यांनी सिद्ध झाले आहे की, मराठी ही अभिजात भाषा आहे, तरी कृपया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी विनंती यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे. या दालनास भेट देणाऱ्या प्रत्येकाने या पत्रावर स्वाक्षरी करून राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत विनंती करावी, असे आवाहनही यावेळी देसाई यांनी केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: w88 download