ममतांचे ‘दूत’ बनून शिवसेनेने महाराष्ट्रद्रोह केला – आशिष शेलार

मुंबई – शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पायघड्या घातल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका आयोजित केल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे, अशी घणाघाती टीका गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. शिवाय राज्य सरकार परमबीर सिंग यांना वाचवत आहे, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही देशासमोर खोटे का बोलला?, याचे उत्तर द्या. हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याने चाला. तिन्ही पक्ष एकमेकांशी बोलत नाहीत. हेच यावरून दिसत आहे. राज्यातले मंत्री खोटे का बोलत होते, याचे उत्तर द्या, अशी मागणी त्यांनी केली.
आशिष शेलार यांनी मागील सात वर्षांत ज्या पद्धतीने मोदी काम करीत आहेत, ते लोकांना मान्य आहे, असा दावा केला. सत्तेतील लोक त्यांचे दूत म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे. जे पराभूत मनोवृत्तीचे आहेत, ते काय ठरवणार?, असा सवाल त्यांनी केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ममता बॅनर्जी ऐकत नाहीत. काँग्रेस आहे हे, ते मानत नाही आणि शरद पवारांचे ऐकत नाहीत. यांचेच एकमेकांचे पाय एकमेकांत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेलार पुढे म्हणाले की, शिवसेनेचा महाराष्ट्रद्रोह आता त्यांच्या लक्षात आला आहे. हा राजशिष्टाचार ममतांसाठी आहे. तो इतरांसाठी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …