मुंबई – मनसेचा शनिवारी होणारा मुंबईतील आणि रविवारी पुण्यात होणारा मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली, मात्र मेळावा रद्द करण्यामागचं कारण मनसेकडून देण्यात आलेले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार २३ ऑक्टोरबर रोजी मुंबईत, तर २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं मनसेच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली असतानाच ऐनवेळी मेळावा रद्द करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याचे कळते. त्यामुळेच आज आणि उद्या होणारे मेळावे रद्द करण्यात आले आहेत. मात्र, राज यांना नेमकं काय झालं याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी भांडूप येथे हा मेळावा होणार होता. या मेळावाच्या आयोजनाबाबत आज मनसे मुख्यालय राजगड येथे बैठक फार पडली होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली होती. या मेळाव्यातून राज ठाकरे मुंबईत मुंबई महापालिका आणि पुण्यात पुणे महापालिकेचं रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं जात होते. हिंदूत्व, भाजपबरोबरची युती, महापालिका निवडणुकीतील रणनीती आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्यात राज यांच्या रडारवर कोण असेल याबाबतही सर्वांची उत्सुकता लागली होती. मात्र, ऐनवेळी मेळावा रद्द झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: hizeed