ठळक बातम्या

…मग निवडणुकीत का पडले?; गिरीश महाजनांचा खडसेंवर निशाणा

जळगाव – भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर थेट टीका केली आहे. स्वत:ला मुख्यमंत्री पदाच्या दर्जाचे नेते समजत होते, तर मग निवडणुकीत का पडले? याचे आत्मपरीक्षण खडसेंनी करावे, असे म्हणत महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय)च्या मुद्यावर बोलतानाही महाजन यांनी खडसेंना चिमटा घेतला. ते म्हणाले की, तुम्ही काहीही केलेले नाही, तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, ईडी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यात काहीही तथ्य नसेल, तर तुम्हाला ईडी वाजत गाजत परत पाठवेल, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जळगावात भाजप १ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारविरोधात धडक मोर्चा काढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, आर्यन खान व समीर वानखेडे प्रकरण, नवाब मलिकांचे आरोप अशा विषयांवर गिरीश महाजन यांनी यावेळी टीका केली. ड्रग्ज प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, राज्यात सर्वसामान्य जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, अख्खे मंत्रिमंडळ एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ताकद लावतेय, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपचा घात केल्याचीही टीका गिरीश महाजन यांनी केली. विधानसभेत जसा दगा दिला तसाच प्रकार जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपसोबत घडल्याचेही त्यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, एखादा अधिकारी चांगले काम करीत असेल तर करू द्या ना, या प्रकरणात जे काही कायद्याने असेल ते होईल, पण एका माणसाला वाचविण्यासाठी सर्व मंत्रिमंडळ का टाहो फोडत आहे? असा सवाल करून नवाब मलिक हे मंत्री असताना सनदी अधिकाऱ्यांच्या बाबतीत चुकीचे आरोप-प्रत्यारोप करीत आहेत, असेही ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …