मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी मुंबईत दाखल झाल्या. ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली; मात्र आता या भेटीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांच्या भेटीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. या भेटीबाबत गुप्तता का बाळगण्यात आली?, असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे सांगत आहेत की, मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी ममता बॅनर्जी यांना भेटत आहे. कौटुंबिक संबंध असल्याचे कारण देऊन नेमके काय लपवले जातेय?, ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत गुप्तता का बाळगली जातेय?, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे आणि ममता यांची भेट गुप्त का ठेवली?, हे काही कट कारस्थान आहे का?, कुणी ही आले की, यांचे कौटुंबिक नाते. आमच्या मनांत शंका आहे की, त्या इथल्या उद्योगांना बंगालमध्ये घेऊन जाण्यासाठी आल्या आहेत. आमचा उद्योग वाढीला विरोध नाही; पण सत्ताधारी पक्ष ते पळवून न्यायला मदत करीत आहेत, असेही आशिष शेलार म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये अनधिकृ तपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई न करण्याची भूमिका तेथील टीएमसीने घेतली आहे. अशा बांगलादेशींना भारतात स्थान देणाऱ्या आणि बांगलादेशी समर्थकांसोबत तुमचे कौटुंबिक नाते काय आहे?, असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशींवरची कारवाई थांबवायचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले का?, असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …