भुसावळमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन

भुसावळ – एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये उघडकीस आली आहे. कोरोना काळात-घरात अन्नाचा कण नाही, त्यामुळे जगून काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे म्हणत एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.
‘संसार रिक्षेची चाके कोरोना काळात थांबली. त्यामुळे आर्थिक विवंचनेसह मुलांची चिंता लागली. घरात अन्नाचा कण नाही. त्यामुळे जगून काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाही’ अशी तोडक्यामोडक्या भाषेत चिठ्ठी लिहून प्रेरणा नगरात राहणाऱ्या कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
आई-वडील, मुलगा आणि मुलीने उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या चौघांवर डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने वेळीच या सर्वांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चारही जणांचा जीव वाचला आहे.
विलास भोळे असे कु टुंबासह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. विलास भोळे हे रिक्षाचालक असून, ते पत्नी व दोन मुलांसह गोकुळधाम रेसिडेन्सी येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध सेवन करून या चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
पण, परिसरातील नागरिकांच्या सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चारही जणांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती या चार जणांची प्रकृ ती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …