ठळक बातम्या

भीमा-कोरेगाव विजयस्तंभाच्या विकासासाठी एक कोटीचा निधी

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय
पुणे – शहराजवळील भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी पुणे महानगरपालिकेने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व इतर सदस्यांनी मिळून हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. स्थायी समिती सदस्य नगरसेवक राहुल भंडारे यांनी विजयस्तंभाच्या विकासाठी निधीची मागणी केली होती.
महानगरपालिकेने भीमा-कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभासाठी दिलेल्या एक कोटीच्या निधीमुळे या परिसराचा विकास करण्यास मोठी मदत होणार आहे. भीमा-कोरेगाव याठिकाणी ऐतिहासिक विजयस्तंभ आहे. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे भेट दिलेली होती. त्यामुळे या रणस्तंभाला संपूर्ण देशासह जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या विविध भागांतून लाखो अनुयायी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येतात. २०१८ मध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे भीमा-कोरेगाव अधिक चर्चेत आले होते.
भीमा-कोरेगावजवळ भीमा नदीकाठी १ जानेवारी, १८१८ मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यांत लढाई झाली होती. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शूरवीरांना हौताम्य आले. या धारातिर्थी पडलेल्या शूरवीरांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये भीमा-कोरेगावजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते, तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातील आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …