भीमा-कोरेगाव : रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग यांना समन्स

पुणे – फोन टॅपिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि १०० कोटी वसुली प्रकरणामुळे बेपत्ता असलेले परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी चौकशी आगोयाने या दोघांनाही समन्स बजावले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाची आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश चौकशी आयोगाने दिले आहेत. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी यासंदर्भात अर्ज केला आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार घडला, त्यावेळी परमबीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) व रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्त्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे ॲड. आशिष सातपुते यांनी सांगितले. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी परमबीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
फोन टॅपिंगप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक आणि राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक मंत्र्यांच्या पीएनजी तसेच काही खाजगी व्यक्तींचे फोन टॅप केले होते.
याबाबत एक अहवालदेखील त्यांनी तयार केला होता. याचप्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात युद्ध छेडले असून, रश्मी शुक्ला यांना याप्रकरणी जबाब देण्यास मुंबई पोलिसांनी भाग पाडले. त्यानंतर आता पुन्हा एकदा भीमा-कोरेगावप्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीला बोलावण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *