ठळक बातम्या

भिवंडीतील त्या वृद्धाश्रमात आणखी १७ जण कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ७९ वर

भिवंडी – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढलेली असतानाच आता भिवंडीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात आणखी १७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याच वृद्धाश्रमात काही दिवसांपूर्वी ६२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता आणखी १७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या ७९वर गेली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. भिवंडी तालुक्यात मातोश्री वृद्धाश्रम आहे. या वद्धाश्रमात काहींना ताप येत होता, तसेच कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर या सर्वांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या १७ जणांमध्ये ४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे, तर एक महिला आणि इतर १२ जण हे केअरटेकर आहेत. यापूर्वी मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल ६२ वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खडवली येथील नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून, त्या ठिकाणी सुमारे १०० हून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …