नागपूर – पेट्रोल, डिझेल शंभरी पार गेल्याने सर्वसामान्यांना त्याचा वापर परवडत नाही. त्यामुळे इंधनाला पर्याय वाहनाला फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे. भारतात आता सर्व गाड्या फ्लेक्स इंजिनवर चालणार असून, यासंदर्भातील महत्त्वाच्या फाइलवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सही केली आहे. अनेक दिवसांपासून वाहने बनवणाऱ्या कंपन्याबरोबर गडकरींची चर्चा सुरू होती, मात्र आता १०० टक्के फ्लेक्स इंजिन लावण्याच्या फाइलवर आपण सही केली असल्याची माहिती खुद्द गडकरी यांनी येथे दिली. ते १३ वर्षे निरंतर चालत आलेल्या ‘ॲग्रोव्हिजन या देशातील कृ षी प्रदर्शनांपैकी अग्रणी असणाऱ्या चार दिवसीय प्रदर्शन व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यावेळी केंद्रीय कृ षी मंत्री नरेंद्रसिंग तोमरदेखील उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, लवकरच चार चारचाकी वाहनांना १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने करण्याचे लक्ष्य आहे. जर असे झाले तर आपल्याला पेट्रोलची गरज पडणार नाही. पर्यायी इंधनामुळे आपले लाखो रुपये वाचणार आहेत. टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटोसारख्या कंपन्यांनी फ्लेक्स इंजिन असणारी दुचाकी आणि तीनचाकी वाहने बनवण्यास सुरुवातदेखील केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या मोठ्या प्रमाणातील आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. तसेच या इंधनांमुळे देशातील प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी काही धोरणे आखली आहेत. २०३० सालापर्यंत देशातील रस्त्यांवर ३० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक वाहने असतील असे सरकारचे ध्येय आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …