ठळक बातम्या

भायखळ्यात लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

मुंबई – भायखळा येथे जे. जे. मार्ग, कॅफे पॅरेडाईस जवळ असलेल्या गुलमोहर टॅरेस या १८ मजली एसआरए इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी झाले. जखमींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली.
भायखळ्यातील गुलमोहर टॅरेस ही एसआरएची १८ मजली इमारत आहे. याठिकाणी असलेल्या चाळी आणि झोपडपट्टी तोडून ही इमारत बांधण्यात आली आहे. शनिवारी रात्री ११च्या सुमारास या इमारतीची लिफ्ट कोसळली. त्यावेळी या लिफ्टमध्ये ५ जण होते. लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात हे पाचही जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

– जखमींची नावे
१) हुमा खान (२४)
२) अर्शा खान (७)
३) सोहन कादरी (३)
४) निलोफर शेख (३६)
५) शाहीन खान (४५)

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …