ठळक बातम्या

भाजपला अध्यक्षांच्या निवडीवर बोलण्याचा अधिकार नाही – कडू

मुंबई – राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. अधिवेशन जादा कालावधीचे असणे आवश्यक आहे, मात्र कोरोना ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता कमी कालावधीचे अधिवेशन आहे. इतर राज्यांमध्ये अधिवेशनाचा कालावधी एक ते दोन दिवस आहे. अधिवेशनाचे दिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कमी आहेत. सरकार जाणीवपूर्वक अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत नाही, असे बच्चू कडू म्हणाले. अधिवेशनाच्या कालावधीच्या बाबतीतील भाजपच्या आरोपांना अर्थ नाही, असेही ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत टीका करणाऱ्या भाजपला बच्चू कडू यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली.
राज्य सरकार स्थापन करण्यासाठी पहाटेचा शपथविधी घेणाऱ्या भाजपला अध्यक्षांच्या निवडीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे बच्चू कडू म्हणाले. भाजपने अध्यक्ष कसा निवडावा? याबाबत बोलू नये, असे बच्चू कडू म्हणाले. सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महावितरणचे चालू बील शेतकऱ्यांकडून घेण्यात यावे हा निर्णय घेतला. चालू बीलच शेतकऱ्यांकडे मागितले जात आहे. शेतकऱ्यांनी चालू बील भरावे, जाणीवपूर्वक कुणी त्रास देत असेल, तर आम्हाला सांगा, असे बच्चू कडू म्हणाले. राजकारणात आजारी माणसासाठी सहानुभूती दाखवली जाते. आजारपणात भान नसलेले उदाहरण म्हणजे भाजप आहे. तो संस्कृ तीवर आधारित पक्ष आहे, पण आता ते संस्कृ ती विसरले असल्याची टीका कडू यांनी केली.
एसटी कामगारांच्या आंदोलनाची वेळ चुकलीय. कोविडमुळे एसटी तोट्यात गेलीय, मात्र मंत्र्याचा ड्रायव्हर ४० हजार कमावतो, पण १०० माणसांना घेऊन जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरला १२ हजार रुपये मिळतात, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी बाजूला व्हावे, असे बच्चू कड़ू म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …