भाजपचे ‘सोशल मीडिया’ प्रभारी जितेन गजारीया पोलिसांच्या ताब्यात

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचे पदाधिकारी जितेन गजारीया यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ताब्यात घेतले आहे. जितेन गजारीया यांनी रश्मी ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. जितेन गजारीया हे भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात ट्विट करताना आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला होता. जितेन गजारीयांनी रश्मी ठाकरेंना उद्देशून ‘मराठी राबडी देवी’ असे ट्विट केले होते.
जितेन गजारीया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नोटीस बजावली होती. त्यानंतर आता जितेन गजारीया यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे आक्षेपार्ह ट्विट त्यांनी का केले आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश होता?, याबाबत आता पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया प्रभारींनी अशाप्रकारे आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने काही तास गजारीया यांची चौकशी केल्याचे समजते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …