सहआरोपीला बंगळुरूमधून केले जेरबंद
मुंबई – ‘बुल्ली बाई’ॲपप्रकरणी पहिल्या आरोपीलामुंबई पोलिसांनी कारवाई करीत बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल कुमार आहे, पण धक्कादायक म्हणजे तो या प्रकरणातील मुख्य आरोपी नसून सहआरोपी असल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमध्ये ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती या ‘बुल्ली बाई’ ॲप प्रकरणाची मास्टर माइंड असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
विशाल कुमार आणि त्या महिलेची मैत्री सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन हा ॲप तयार केला. सोशल मीडियावर अकाऊं ट बनवताना त्यांनी शीख समुदायाच्या नावाचा वापर केला होता. विशाल कुमारने खालसा सुप्रीमिस्ट नावाने अकाऊं ट बनवले होते, जे ३१ डिसेंबरला बदलले आणि खोटे खालसा अकाऊं ट बनवून त्याला तो फॉलो करू लागला. शीख समुदायाच्या नावाने त्याने अकाऊं ट बनवले होते, जेणेकरून लोकांना वाटावे की, हे अकाऊं ट शीख लोकांनी बनवले आहे. ज्या महिलेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ती महिला जे तीन मुख्य अकाऊं ट आहेत ते हँडल करीत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बुल्ली बाई’ ॲप्लिकेशनवर काही पत्रकार महिलांसह जवळपास १०० प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती.
पोलीस तळाशी जाणार – मलिक
याबाबत राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले आहे. मागील सहा महिन्यांपासून हे सुरू असून, राज्य सरकार तसेच पोलीस याचा छडा लावणार आहेत, अशी माहिती दिली आहे. सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. दिल्ली पोलिसांनी याची दखल घेतली नाही, मात्र राज्य सरकार आणि पोलीस तळाशी जाऊन याचा छडा लावणार आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …