दिल्ली पोलिसांची आसाममध्ये कारवाई
नवी दिल्ली/मुंबई – ‘बुल्लीबाई’अॅप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने आसाममधून अटक केली आहे. पोलीस उपायुक्त (डीसीपी) केपीएस मल्होत्रा यांच्या पथकाने ही कारावाई केली आहे. या आरोपीचे नाव नीरज बिश्नोई असे असून, तो ‘गिटहब’अॅपवरून हा अॅप बनवणारा मुख्य आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नीरजने ‘बुल्लीबाई’ ॲप गिटहबच्या सह्याने बनवले होते. नीरज हा गिटहबवर बुल्लीबाई अॅप तयार करणारा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी नीरज बिश्नोई हा सुमारे २१ वर्षांचा आहे. यापूर्वी, दिल्ली महिला आयोगाने ‘बुल्लीबाई’ आणि ‘सुल्ली डील’अॅप्सवरील आक्षेपार्ह सामग्रीच्या चौकशीसंदर्भात या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली पोलिसांना हजर राहण्यास सांगितले आहे. दिल्ली महिला आयोगाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘गिटहब’अॅपवर अनेक मुस्लीम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय अपलोड केल्याबद्दलच्या प्रसारमाध्यमांमधील बातम्यांची स्वत:हून दखल घेतली. आयोगाने दिल्ली पोलिसांना हजर राहून ‘सुल्ली डील’ आणि ‘बुल्लीबाई’ प्रकरणात अटक केलेल्यांची यादी करण्यास सांगितले होते.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …