बारावी परीक्षेचे ‘ऑनलाइन’ अर्ज आजपासून स्वीकारले जाणार

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (एमएसबीएसएचएसई)मार्फत २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार १२ नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी ६६६.ेंँंँ२२ूुङ्मं१ि.्रल्ल ??????????????या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ‘सरळ’ डेटाबेसवरून नियमित शुल्कासह १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरायची आहेत, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज १३ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ असा आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार २८ डिसेंबर २०२१ रोजी जमा करावयाची आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी कळवले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …