बांधकामात ९ कोटींचा गैरव्यवहार झालाय? नागपूर पीडब्ल्यूडी कार्यालयावर राज्य कर विभागाचा लेटरबॉम्ब

नागपूर – अशोक चव्हाण यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागा (पीडब्ल्यूडी)च्या कार्यालयावर लेटरबॉम्ब टाकण्यात आला आहे. अजित दादांच्या अखत्यारीतील नागपुरातील राज्य कर विभागाने पीडब्ल्यूडीविरोधात निकृ ष्ट कामाची तक्रार केली आहे. नागपुरात ९ कोटी रुपयांच्या कामाच्या गैरव्यवहाराची लेखी तक्रार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
राज्य वस्तू व सेवाकर भवन कार्यालयात निकृष्ट काम करण्यात आले आहे. ग्रेनाइट चक्क खिळ्याने ठोकले. पीडब्ल्यूडीचे अधिकारी, पुरवठादाराच्या संगनमताने गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि पुरवठादारांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची लेखी तक्रार आहे. अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली.
एका वर्षात कार्यालयातील कपाटाची दारे निघाली आहेत. पाच वर्षे होऊन नुतनीकरणाचे काम न संपल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. ५ कोटी ४८ लाख रुपये खर्च होऊनही ३० टक्के काम अपूर्ण असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. फर्निचर आणि नुतनीकरणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार नागपूर क्षेत्राचे अप्पर राज्य कर आयुक्त यांनी पत्रातून केली आहे.
शिल्लक निधी विद्युतीकरणाकरिता वापरून काम पूर्ण करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वीस लाखांचा निधी विद्युतीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला. हा निधी उपलब्ध करण्यासाठी तीन वर्षे का लागली?, असा प्रश्न या पत्राच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. याला सार्वजनिक विभाग आणि संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचेही म्हटले आहे.
नुतनीकरणांतर्गत दुसऱ्या माळ्यावर लावण्यात आलेल्या ग्रेनाइटचे काम बेसुमार दर्जाचे आहे. बाथरूममध्ये लावण्यात आलेले बेसीन, नळ तसेच पाइपलाइनमध्ये वारंवार बिघाड होतो. बाथरूमला लावण्यात आलेली दारे कमी दर्जाची आहेत. पहिल्या मजल्यावरील महिला प्रसाधन गृहामधील टाइल्स फुटल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, असेही या पत्रात लिहिले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …