ठळक बातम्या

‘फोन टॅपिंग’ ला नवे वळण : सायबर सेलने पाठवली फडणवीसांना चौकशीची प्रश्नावली!

मुंबई – फोन टॅपिंगप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत सापडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता, तर आता याचप्रकरणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही मुंबई सायबर सेलने चौकशीसाठी प्रश्नावली पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती दिली.
हिवाळी अधिवेशनामध्ये एकीकडे भाजपने महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जोर लावला आहे, तर दुसरीकडे आता फोन टॅपिंगप्रकरणी हालचालींना वेग आला आहे. रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
रश्मी शुक्ला प्रकरणामध्ये मला सायबर सेलने अद्याप साक्षीसाठी बोलवलेले नाही. मला सायबर सेलने एक प्रश्नावली पाठवली आहे. त्यानंतर एक पत्र पाठवले. मी न्यायालयातले प्रकरण संपल्यानंतर त्यावर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली, तसेच मी विरोधी पक्षनेता असल्याने मी भ्रष्टाचाराचे प्रकरण का बाहेर काढले? हे मला कोणीही विचारू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. तसेच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता, रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. एवढेच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती, पण त्यांनी याचा गैरवापर केला. शुक्ला यांनी फोन टॅप करण्यासाठी रितसर परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती, पण हे करीत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोनसुद्धा टॅप केले आहेत, असा आरोप काही मंत्र्यांनी केला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …