ठळक बातम्या

फेसबुकवरील मैत्री महागात; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

भोपाळ – मध्ये प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटनासमोर आली आहे. पीडित तरुणी मूळची उत्तर प्रदेशमधील झाशीची रहिवासी असून, ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे राहून पोलीस भरती परीक्षेची तयारी करीत होती. एका फेसबुक फ्रेंडने नोकरीसाठी मुलाखत देण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण या दोघांची फेसबुकवर २ महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. तरुणीच्या दाव्यानुसार आरोपीने तिला नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने १९ ऑक्टोबरला ग्वाल्हेरला बोलावले. ती ग्वाल्हेरला आल्यावर मुलाने तिला बहोदापूर येथील भाड्याच्या खोलीत नेले आणि झोपेच्या गोळ्या मिसळलेले शीतपेय तिला प्यायला दिले. ती बेशुद्ध झाल्यावर तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडीओ शूट केला.
बलात्कारानंतर आरोपीने विद्यार्थिनीची कागदपत्रेही स्वत:जवळ ठेवली. रविवारी आरोपीने तिला कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने पुन्हा बोलावले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला, परंतु कागदपत्रे परत केली नाहीत. त्याने नंतर तिला डीआरपी लाईनच्या बाहेर सोडले. अखेर तिने बहोरापूर पोलीस ठाणे गाठून एफआयआर दाखल केला. बहोदापूर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …