ठळक बातम्या

फरारी परमबीर सिंग बेल्जियममध्ये – संजय निरूपम यांचा दावा

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये असल्याचा दावा निरूपम यांनी केला आहे, मात्र परमबीर सिंग हे बेल्जियममध्ये कसे पोहोचले आणि त्यांना कुणी मदत केली, असा सवाल निरूपम यांनी उपस्थित केला आहे.
बिल्डरकडून वसुली केल्याचा आरोप असलेल्या परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबईतील एका कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, परमबीर सिंग यांच्याबाबत निरूपम यांनी एक ट्विट करत मोठा दावा केला आहे. त्यात ते म्हणतात की, हे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. मंत्र्यांवर हप्ते वसुलीचा आरोप यांनी केला होता, मात्र ते स्वत: पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी सांगितले की, ते फरारी आहेत; मात्र आता माहिती मिळतेय की, ते बेल्जियममध्ये आहेत. ते बेल्जियममध्ये गेले कसे?, त्यांना जाण्यासाठी सेफ पॅसेज कुणी दिला?, आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाही का?, असा सवाल निरूपम यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई क्राइम ब्रँचने केलेल्या अर्जावर कारवाई करताना मुंबईमधील एका न्यायालयाने परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंग यांच्याबरोबरच कोर्टाने विनय सिंह आणि रियाझ भाटी यांच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त असतानाच अँटिलिया बॉम्ब प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंग यांनाही मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंग सुट्टीवर गेलेले होते, तसेच त्यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता, तेव्हापासून परमबीर सिंग फरारी आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment