फडणवीस सरकारच्या काळातील ६५०० कोटींच्या कामांची चौकशी; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश

मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील ६५०० कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. २०१४ ते २०१९ या काळात पायाभूत सुविधांकरिता ६५०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती; मात्र पुन्हा २०२० मध्ये विविध ठिकाणांच्या आमदारांकडून आलेल्या मागणीनुसार पुन्हा २३०० कोटींची कामे करावी लागत आहेत. २०१४ ते २०१९ या काळात झालेल्या पायाभूत सुविधा विकासांच्या कामांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. आधीच ६५०० कोटी रुपयांची कामे झालेली असताना, पुन्हा त्याच पद्धतीची कामे का येत आहेत? याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असताना, फडणवीस सरकारच्या काळातील विद्युत यंत्रणेच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी आता लागल्याने सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष पेटणार आहे. फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या ६५०० कोटींच्या कामांच्या चौकशी करिता चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती १ डिसेंबर २०२१ पूर्वी अहवाल राज्य सरकारला सादर करेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …