फडणवीस यांना कायदेशीर नोटीस * मलिकांच्या लेकीने शड्डू ठोकला

मुंबई – गेले अनेक दिवस ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा सनसनाटी दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर फडणवीस विरुद्ध मलिक, अशी लढाई सुरू झाली आहे. या लढाईत फडणवीसांनी मलिकांच्या जावयाचे नाव घेतले; पण फडणवीसांच्या दाव्याचा उल्लेख पंचनाम्यात नाही. या सगळ्या प्रकरणानंतर नवाब मलिक यांची कन्या निलोफर खान यांनी आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांना थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी फडणवीसांनी विधाने मागे घ्यावेत अन्यथा माफी मागावी, अशी मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केले त्यामुळे एका कुटुंबाची बदनामी झाली. त्यामुळेच माझ्या मुलीने फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांनी याप्रकरणी माफी मागितली नाही, तर क्रिमिनल आणि सिव्हिल सूट फाइल आहे. प्रत्येकाला राईट टू स्पीक आहे; पण राईट टू अब्यूज नाही. मानहानी होत आहे. त्यामुळेच मुलीने नोटीस पाठवली असून, त्यांनी माफी नाही मागितली, तर मानहानीचा दावा करणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले.
नवाब मलिक यांची ‘बिगडे नवाब’ अशी निर्भत्सना करणाऱ्या अमृता फडणवीस यांना मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. सत्य तुमच्या बाजूने आहे, तर घाबरता कशाला? असा सवालच निलोफर मलिक खान यांनी अमृता फडणवीस यांना विचारला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …