मुंबई – राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी व्यक्ती, संस्था आणि संघटनांद्वारे निवडणूक निधी मिळत असतो. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेच्या मते, शिवसेना, आप, द्रमुक आणि बिजू जनता दल यांच्यासह इतर प्रादेशिक पक्षांनी २०१९-२०मध्ये २३३.६८५ कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त केल्या आहेत. २०१९-२० या वर्षात देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक निवडणूक निधी शिवसेना पक्षाला मिळाला आहे. देशात सर्वाधिक निवडणूक निधी मिळालेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिवसेनेला अच्छे दिन आल्याचे म्हणावे लागेल. आम आदमी पार्टी (आप) या पक्षाला विदेशातूनही निधी मिळाला आहे. विदेशातून २० हजारांपेक्षा जास्त निधी मिळणारा आप हा एकमेव पक्ष ठरला आहे.
२०१९-२० या काळात प्रादेशिक पक्षांना ६ हजार ९२३ देणग्यांमधून २३३.६८५ कोटी रुपये निधी मिळाला. त्यातील सर्वाधिक ६२.८५९ कोटी रुपये निधी शिवसेनेला मिळाला. ही रक्कम ४३६ दानांमधून आली होती. त्या खालोखाल अण्णाद्रमुकला ५२.१७ कोटी, आम आदमी पक्षाला ३७.३७ कोटी, बिजू जनता दलाला २८.२० कोटी, तर वायएसआर काँग्रेसला ८.९२४ कोटी रुपये मिळाले. २० हजार रुपयांपेक्षा जास्त निवडणूक दान/निधी/डोनेशन मिळाल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्या आधारावर एडीआरने ही माहिती प्रसारित केली आहे. या पाच प्रादेशिक पक्षांनी देशातील प्रादेशिक पक्षांना मिळणाऱ्या निधीपैकी ८१ टक्के निधी प्राप्त केला आहे. आम आदमी पार्टी, एलजीपी, जेएमएस आणि समाजवादी पार्टी यांना मिळणाऱ्या निवडणूक दानांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …