सातारा – छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथा सांगणाऱ्या दिवसांमधील एक दिवस म्हणजे प्रतापगडावरील अफजल खानाचा वध. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शुक्रवारी (१० डिसेंबर) या दिवसाला ३५३ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने प्रतापगडावर प्रशासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवप्रताप दिना दिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात प्रतापगडावर माथा टेकण्यासाठी येत असतात. मात्र कोरोना आणि नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे गडावर शिवप्रेमींना बंदी घालण्यात आली होती. सोबतच १४४ कलम लागू करण्यात आले होते. त्यामुळे साध्या पद्धतीने गडावरचा हा उत्सव शासकीय यंत्रणेने पारा पाडला. नेहमीप्रमाणे सकाळी गडावरील देवीच्या मंदिरात प्रथम पूजा करण्यात आली. गडावरच्या शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक मंदिरातून निघाली. नंतर गडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यंदाच्या शिवप्रताप दिनानिमित्त कोणताही ढोल ताशा वाजवण्यात आला नव्हता. तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली नाही.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …