पिंपरी-चिंचवड – पुण्यात पोलिसांनाच गंडा घालणाऱ्या एका भामट्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील गोरेगाव भागातून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अहमदाबादचे पोलीस आयुक्त बोलत असल्याचे सांगून तो पोलिसांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आहे. यापूर्वीही त्याने पोलिसांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मी अहमदाबादचा पोलीस आयुक्त बोलतोय. तुमच्या शहरात बंदूक विक्रीची मोठी डील होणार आहे, असे हा भामटा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगत असे. त्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून आरोपीने पैशांची मागणी केल्याचेही समोर आले आहे. संशय आल्याने पोलिसांनी सापळा रचला. त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला पैसेही पाठवले. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला गोरेगावमधून अटक केली. यापूर्वीही त्याने पोलिसांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …