पोलिसांची पगार खाती ॲक्सिस बँकेमध्ये वळवली

फडणवीस-एसबीआयला कोर्टाची नव्याने नोटीस
नागपूर – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ॲक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ला नोटीस बजावली आहे. गृह विभागाच्या कर्मचाऱ्यांची पगार खाती ॲक्सिस बँकेत हस्तांतरित करण्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला चार आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोहनीश जबलपुरे यांनी ही याचिका दाखल केली होती. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार, मोहनीश जबलपुरे यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ॲक्सिस बँकेला लाभ मिळावा, या हेतूने फडणवीस यांनी बँकेची खाती मुख्यमंत्री असताना वळविली होती. कारण ॲक्सिस बँकेत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नोकरीवर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस अधिकारी आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बँक खाती ॲक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात अनियमितता झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर नव्याने नोटीस बजावली. ॲक्सिस बँकेत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उच्च पदावर नोकरी करतात.
न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँकेलाही ही नोटीस बजावण्यात आली. महाराष्ट्र सरकार, पोलीस महानिरीक्षक आणि नागपूरचे पोलीस आयुक्त यांना आधीच अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे. फडणवीस यांना ही नोटीस यापूर्वीच बजावण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्यांचा पत्ता बदलला. ते मुख्यमंत्री असताना ही नोटीस बजावण्यात आली होती, पण तोपर्यंत त्यांचा राहण्याचा पत्ता बदलला. बुधवारी न्यायालयाने पत्ता बदलून त्यांना नव्याने नोटीस दिली आहे. चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …