पेढ्यातून गुंगीचे औषध देत विवाहितेवर बलात्कार

वाळूज – औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका २४ वर्षीय तरुणाने ३० वर्षीय विवाहित महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बेशुद्धावस्थेतील महिलेवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केले आहे.
आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेने वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीवर बलात्कारासह ब्लॅकमेलच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. नितीन अशोक पतंगे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो रांजणगाव शेणपुंजी येथील जयभद्रा शाळेजवळील नर्सरी कॉलनी येथील रहिवासी आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती आणि मुलांसह रांजणगावात पतंगेच्या कॉलनीत भाड्याने राहत होती. याचदरम्यान आरोपीची पीडितेशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर ८ एप्रिल २०२१ रोजी आरोपी नितीन याने पीडित महिलेला गुंगीचे औषध टाकलेला पेढा खायला दिला होता. त्यामुळे पीडित महिला बेशुद्ध झाली होती. याचा फायदा घेत नितीनने बेशुद्धावस्थेतील महिलेवर बलात्कार केला आणि संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला. शुद्धीवर आल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिला समजले.
पण घटनेची वाच्यता केल्यास संबंधित व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर ब्लॅकमेल करीत आरोपीने ४ महिने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. २० नोव्हेंबर रोजी देखील आरोपीने पीडितेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडितेने सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने धीर दिल्यानंतर पीडितेने वाळूज पोलीस ठाण्यात नितीन विरोधात गुन्ह दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …